*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”पंढरी अनन्य स्थान”*
भक्तिच्या वाटेवर पंढरी अनन्य स्थान
दर्शनार्थ आसुसले वारकऱ्यांचे मनIIधृII
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तिष्ठत
कर कटेवरी ठेवून वाट पाही प्रेमानं
घडता भक्तांचे दर्शन पावे समाधानII1II
चंद्रभागा भीमा तीरी जमती भक्तगण
आसुसल्या सरिता कधी करिती भक्त स्नान
स्नान करिता नद्यांत पापे जाती जळूनII2II
आषाढी कार्तिकी जमती बहु भक्त जन
वारीत नसे भेदाभेद मिळे परमानंद
विसरती घरदार दुःख देहभानII3II
करिती जप राम कृष्ण हरी नित्य जन
तुळशी माळ गळा बुक्का कपाळी लावून
पंढरीत मिळे संतांचे दर्शन समाधानII 4II
श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.