You are currently viewing अतिवृष्टीमुळे बांद्यातील डॉ. स्वार यांच्या मेडिकल क्लिनिकचे ४ लाखाचे नुकसान..

अतिवृष्टीमुळे बांद्यातील डॉ. स्वार यांच्या मेडिकल क्लिनिकचे ४ लाखाचे नुकसान..

बांदा :

 

अतिवृष्टीमुळे बांदा येथील दातांचे डॉक्टर अनिष स्वार यांच्या हस्ते दवाखान्याच्या पायर्‍या कोसळल्या. यात त्याचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान पायर्‍या नसल्यामुळे पुढील १५ दिवस दवाखाना बंद ठेवण्याचा निर्णय डॉ. स्वार यांनी घेतला आहे. दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसात ही घटना घडली. बाजूला असलेल्या ओहोळात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही घटना घडली, असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा