You are currently viewing मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे आंबोली घाटाला पर्यायी रस्त्याचा प्रश्न मार्गी!

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे आंबोली घाटाला पर्यायी रस्त्याचा प्रश्न मार्गी!

*अर्थसंकल्पात निधीची तरतूद*

 

*शिल्पग्राम हॉटेलमधे पत्रकारांना पेढे वाटून साजरा केला आनंद*

 

सावंतवाडी :

आंबोली घाटाला पर्यायी असणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ मार्गासाठी ६० कोटी रूपये निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे झाल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिली.

ही माहिती देण्यासाठी संदीप गावडे यांनी सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

आंबोली घाटाला एक सक्षम व सुरक्षित असा हा पर्यायी मार्ग मिळणार असून गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न आता मार्गी लागल्याने पत्रकारांना पेढे वाटून पालकमंत्री रविंद्र चव्हाण आंबोली पर्यटन विकासाचे शिल्पकार असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, आंबोली घाटाला पर्यायी असणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ मार्गासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ६० कोटी रूपये निधीची तरतूद केली आहे. साधारणतः सव्वा नऊ किलोमीटर चा हा रस्ता असणार आहे. वनविभाग, जागा हस्तांतरणासाठी वेगळ्या दहा कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे अशी माहिती संदीप गावडे यांनी दिली. तर याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे त्यांनी आभार मानले. आंबोली घाटाला एक सक्षम व ल चालना देणारा नवा मार्ग यामुळे मिळणार असून आंबोलीसारखेच अद्भुत पर्यटन या मार्गावर देखील बघायला मिळणार आहे. यामुळे प्रवासाच अंतर देखील वाचणार आहे‌. गेली अनेक दशक ज्याची मागणी होत होती तो प्रश्न आता मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खात सिंधुदुर्गला मिळाल्यानंतर येथील विकास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. विकासाचा दृष्टीकोन बदलत आहे. आंबोली घाटाला पर्यायी मार्गामुळे सह्याद्रीची एक वेगळी ओळख जगासमोर येणार आहे. त्याचबरोबर आंबोली घाटाच संवर्धन देखील होणार असल्याचं मत संदीप गावडे यांनी व्यक्त केल. या मार्गाचे शिल्पकार हे मंत्री रविंद्र चव्हाण असल्याचा मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केल. केसरी भागाचे प्रतिनिधित्व करताना या मार्गासाठी संदीप गावडे यांनी देखील मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रवींद्र चव्हाण यांच्या या निर्णयानंतर तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, श्री. गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा