मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या शुभहस्ते नारळ अर्पण करून जलपूजा..
सावंतवाडी :
सतत गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे सावंतवाडी नगरपरिषदेचे पाळणेकोंड धरण पूर्ण भरून वाहत आहे. त्यामुळे आता शहराला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. पाळणेकोंड धरणाचे सर्व सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडले असून धरण तुडुंब भरल्यामुळे सावंतवाडी शहरासाठी आनंददायी ही आनंदाची बातमी आहे . सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा होणारे पाळणेकोंड धरण दरवर्षी जुलै महिन्यात भरते आणि हे धरण भरल्यानंतर गेली कित्येक वर्षांपासून नारळ अर्पण करून सदर धरणाची पूजा करण्याची अनोखी प्रथा नगरपालिकेने जपली आहे.
यावर्षीही धरण तुडुंब भरले असून आज मंगळवारी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या शुभहस्ते नारळ अर्पण करून जलपूजा करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे भाऊ भिसे, पिळणकर उपस्थित होते. पाळणेकोंड धरण हे सावंतवाडी शहराला 24 तास पाणीपुरवठा धरण आहे.