जाणवली ग्रा. प. येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रस्ताव करण्यासाठी कक्ष सुरू
सरपंच अजित पवार पुढाकाराने योजनेचा अर्ज भरण्याचे का सुरू
कणकवली :
जाणवली ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करणे आणि ते शासनाकडे पाठविण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.त्यातील काही महिलांचे अर्ज आज भरण्यात आले. महिलांना या योजनेचे मार्गदर्शन आणि अर्ज भरण्यासाठी सरपंच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष सुरू करण्यात आला आहे.
जानवली ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गावातील लाभार्थी महीलांचे फॉर्म भरण्यात आले. यावेळी सरपंच श्री. अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, ग्रा. पं. सदस्य नितीन राणे, दामू सावंत, प्रिती कदम, अनुष्का राणे, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व महीला भगिनी उपस्थित होत्या. तसेच CRP सौ. दिशा राणे व उन्नती राणे उपस्थीत होते.