You are currently viewing मी पाया पडत नाही !

मी पाया पडत नाही !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी पाया पडत नाही !*

 

समोरचा मला ओळखत नाही

मी समोरच्याला ओळखत नाही

समोरचा कुणी कां असेना

मी त्याच्या पाया पडत नाही

 

पाया पडायचं ते पडून झालं

बालपणीच्या संस्कारातून ते घडून गेलं

आईबाबा गुरूजन आप्तजन!संपल सार

काळाच्या ओघात पूर्वीच ते होवून गेलं

 

देवाचीच एक रुखरुख मनात माझ्या

मी ओळखतो!तो मला ओळखत नाही

मी त्याला दुरून हात जोडतो तेही माझ्या

आईकरता!त्याच्या पाया पडत नाही

 

ज्यांचा आदर,सन्मान प्रेम मी करतो

त्यांना मनोभावे सदैव नमस्कार करतो

संस्कारापोटी कुणी लहान माझ्या पाया

पडला!तर मी वाकून त्याचे पाय धरतो

 

प्रवाहाचे नाकर्तेपण अंगावर येत माझ्या

तरीही मी कुणाच्याही पाया पडत नाही

अनाठायी दुस-याच्या पुढ्यात वाकणं

अश्या वाकवणा-यांच्या!पुढयात मी जात नाही !

मी पाया पडत नाही!!

 

महानुभव!पाय पुढे करूनच बसतात

तुमच्या पाया पडण्याची वाट बघतात

त्यांना हळुवार कानांत सांगाव….!

आदरपूर्वक हात जोडून नमस्कार 🙏 ही पुरेसे असतात..

 

बाबा ठाकूर धन्यवाद

ही रचना ! माझं वैयक्तिक मत आहे

तेच मी मांडलं !

व्यक्तीचे पाय धरणं !लोटांगण घालणं

मला मान्य नाही..!

प्रतिक्रिया व्यक्त करा