सावंतवाडी
सावंतवाडी रोटरी क्लबने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्याचे अभियान हाती घेतलेले आहे.या फलकाचे अनावरण आज माजी केंद्रीय मंत्री मा.सुरेशजी प्रभू यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा मा.उमा सुरेश प्रभू,भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.राजन तेली, रोटरीचे अध्यक्ष मा.डॉ. राजेश नवांगुळ, रोटरीयन श्री. म्हापसेकर, पुखराज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.मा.प्रभूसाहेबांने यावेळी सावंतवाडी रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.