You are currently viewing राजा शिवाजी चौक येथील वडापाव विक्रेता मनवेल डिसोजाने जपली सामाजिक बांधिलकी.

राजा शिवाजी चौक येथील वडापाव विक्रेता मनवेल डिसोजाने जपली सामाजिक बांधिलकी.

राजा शिवाजी चौक येथील वडापाव विक्रेता मनवेल डिसोजाने जपली सामाजिक बांधिलकी.

सावंतवाडी

काही दिवसापासून माठेवाडा येथील दहा वर्षीय मुलगी महेनुर शेख ही एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. तिच्या उपचारासाठी जवळपास 15 लाखाची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर व वृत्तपत्रांमध्ये बातमी व्हायरल झाल्यानंतर तिच्या समाजातील तसेच इतर समाजातील लोक त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदतीला धावली त्यामध्ये राजा शिवाजी चौक येथील एक सर्वसाधारण रस्त्यावर गाडा लावून वडापाव विकणारा मनवेल डिसोजा सदर बातमी वाचून अतिशय भाऊ होऊन सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव शी संपर्क साधला व आपण त्या मुलीला पाच हजार रुपये मदत करणार आपल्याला त्याच्या घरी घेऊन चल असे सांगून सदर मुलीच्या उपचारासाठी पाच हजार रुपये मदत घेऊन त्या मुलीच्या नातेवाईकाकडे सुपूर्त करून एक माणुसकीचे दर्शन घडवल आहे. त्याचप्रमाणे मनवेल डिसोजा म्हणाले अशाच प्रकारे यथाशक्ती मी माझ्या मित्र मित्रमंडळी कडून सदर मुलीच्या उपचारासाठी मदत मिळून देईन अशी ग्वाही दिली.
एक सर्वसामान्य वडापाव विक्रेता सढळ हाताने एवढ्या मोठ्या रकमेची मदत करू शकतो याबाबत मनवेल डिसोजा यांचे आभार व कौतुक राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, मुस्लिम हेल्प फाउंडेशनचे मोहसीन मुल्ला व तन्वीर शहा उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा