कोकण विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे कोकणचे सुपूत्र व माजी केंद्रीय मंत्री,भारत सरकारचे शेर्पा आणि खासदार मा.सुरेशजी प्रभू यांच्या रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या पाच दिवसांच्या झंझावती दौऱ्याला आज आरोंद्यापासून सुरूवात झाली. कोरोना काळतही दिल्लीत राहून अहोरात्र आपल्या स्तरावर अनेकांना मदत करत असताना वेबनारच्या माध्यमातूनही कोरोना संकटावर मात करण्यासाठी सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक,मच्छीमार, छोटेमोठे उद्योजक, शिक्षणसंस्था अशा अनेक घटकांना आवश्यक ते मार्गदर्शनही केले…आणि आता कोरोनाचं संकट थोडफार कमी झाल्यावर जिल्ह्यात येवून प्रत्यक्ष सुसंवाद साधत आहेत.
शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन साहेब सातत्याने गेली तीस वर्षे कार्यरत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आज साहेबांनी माणगाव येथे सुरु असलेल्या डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्पाची तपशीलवार माहिती घेतली.या प्रकल्पाचे संचालक श्री सुनील उकिडवे यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उपलब्ध करुन दिलेल्या रोजगाराच्या संधी आणि भविष्यकालीन योजना याबाबत माहिती दिली.साहेबांनी या दिशादर्शक प्रकल्पाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी मानव संसाधन संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ.उमा प्रभू मँडम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, विद्याभारतीचे श्री. मुतालिक, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.नकुल पार्सेकर, परिवर्तन केंद्राचे विलास हडकर, भाजपाचे चिटणीस विजय केनवडेकर, रोटरीचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ आदी मान्यवर उपस्थित होते.