You are currently viewing शीर्षक : निवडुंग

शीर्षक : निवडुंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शीर्षक:- निवडुंग…*

 

काया ओबडधोबड

रूप कुरूप काटेरी…

परी माया आभाळाची

जपे निवडुंग उरी…।। १ ।।

 

भासे आकार, विकार!

जसा वृक्ष हो शापित…

धग सोसूनही रणी

करे अस्तित्व स्थापित…।। २ ।।

 

वृक्ष तरूवर मोठे

करे जिथे पाणी-पाणी…

वदे निवडुंग तिथे

आबादानीची कहाणी…।। ३ ।।

 

जपे औषधीय गुण

परी मौन ते राखून…

व्याध्या विकार वारण्या

देई मोठे योगदान…।। ४ ।।

 

म्हणतो झुडूप कोणी

कुणी तो काट्यांची खाण…

थोडा संघर्षही त्याचा

बघा एकदा निदान…।। ५ ।।

 

देतो शिकवण आम्हां

निवडुंग तो पहाणा…

सांगे सोडून बहाणे

द्यावे तोंड संकटांना…।। ६ ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा