*बावळाट-दाणोली मार्गावर कोसळलेली दरड केली दूर; वाहतूक पूर्ववत सुरू*
सावंतवाडी
येथील बावळाट-दाणोली मार्गावर मोठी दरड कोसळल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा तात्काळ धावली व त्यांनी रस्त्यावरची माती बाजूला करून रस्ता पूर्व सुरू केला. ही घटना आज सकाळी सरमळे संपतनाथ मंदिराच्या शेजारी एका वळणावर घडली होती. त्यामुळे सावंतवाडी शहरातून वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात पाऊस असल्यामुळे बऱ्या ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.