You are currently viewing अतिवृष्टीमध्ये जामसंडे खाकशी वाडी येथे कोसळली पाऊलवाटेची संरक्षक भिंत…

अतिवृष्टीमध्ये जामसंडे खाकशी वाडी येथे कोसळली पाऊलवाटेची संरक्षक भिंत…

अतिवृष्टीमध्ये जामसंडे खाकशी वाडी येथे कोसळली पाऊलवाटेची संरक्षक भिंत…

कोसळल्या संरक्षण भिंतीचे चिरे पेडणेकर यांच्या अंगणामध्ये..

देवगड

देवगड तालुक्यात रविवार व सोमवारी पावसाने धुवाधार बॅटिंग केली आहे त्या ठिकाणी यामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन वाहतुकीचा खोळंबा देखील झाला आहे. सोमवारी पहाटे तर पावसाने हाहाकारच माजविला ठिकठिकाणी रस्ते,मळेशेती माड बागायची पाण्याखाली गेल्या होत्या.
देवगड तालुक्यातील जामसंडे खाकशीवाडी येथील विलास पेडणेकर यांच्या घरासमोरील चिरेबंदी घाटीची दरड कोसळून नुकसान झाले आहे. सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील खाकशीवाडी येथील पेडणेकर घाटी या ठिकाणी नगरपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे चिरे कोसळून सोमवारी ८ जुलै रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळली असून या संरक्षण भिंतीचे दगड पूर्णत: श्रीधर पेडणेकर यांच्या अंगणामध्ये पडले आहेत. अंगणामध्ये संरक्षण भिंतीचे दगड आल्याने त्यांना घराबाहेर पडणे देखील कठीण बनले आहे.
दरम्यान सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी आल्याने हिंदळे ते मोर्वे, मिठबाव ते दहिबाव, दहिबाव ते नारिंग्रे,कोटकामते ते खुडी, हे मार्ग बंद होते तर रहाटेश्वर ते कालवी गढीताम्हणे विजयदुर्ग या भागातील कॉजवे देखील पाण्याखाली आले होते दुपारी 11 नंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा