*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माऊली माऊली….*
आषाढ चे आगमन
पुंडलिकाचे आवतन
वारीं चे प्रस्थान
पंढरपुरा…
मेघ मल्हार बरसे
भुई हिरवाई लेई
मोर थुईथुई नाचे
पंढरपुरा…
चंद्रभागा होई आतुर
नीज स्नाने घडवीतसे
वारकरी तृप्त होसी
पंढरपुरा…
घरी बसुनी जनता
करीतसे वारी मना
पाही मुखचंद्र विठूचे
पंढरपुरा…
धन्य धन्य पंढरी
संतांची मांदियाळी
वारकरी समवेत
पंढरपुरा…
माऊली माऊली
उद्घोष मनामनात
पोहचवी विठुसी
पंढरपुरा…
एकादशी दिनी
भक्तजन एकवटले
दिंडीवारी निजधामे
पंढरपुरा…
दर्शन मायबाप
घडवी श्री हरी
पांडुरंग विटेवरी
पंढरपुरा…
………………………
©पल्लवी उमेश
7/7/24