*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम अभंग रचना*
*वारी आषाढीची*
*अभंग* 🌹
*(6/6/6/4)*
आषाढी वारीचा / उपवासआज
चढवीला साज / पांडुरंगा
गळा वैजयंती / तुळशीच्या माळा
शोभतो सावळा / पांडुरंग
पहावा विठ्ठल/ भजावा विठ्ठल
स्मरावा विठ्ठल / रात्रंदिन
टाळ वीणा वाजे / पंढरी नगरी
पांडुरंग हरी. / दंग होई
विठ्ठल नामात / गर्जली पंढरी
दंग वारकरी / भजनात
दुथडी भरली / माय चंद्रभागे
तुझी ओढ लागे / तीर्थासाठी
नामयाची जनी / नाथोबा तुकोबा
सावता चोखोबा / संतजण
दर्शनाची आस / लागे पांडुरंग
तव नामी दंग / सर्वकाळ
पद्म नाभावरी / रुसली रुख्माई
राग सोड आई / आतातरी
उभा वीटेवरी / युगे अठ्ठावीस
जीव कासावीस / पांडुरंगा
विठु पांडुरंग / दिनांची सावली
भक्तांची माऊली / पंढरीत
तुचं माझीआस / तुचं माझा ध्यास
तुचं माझा श्वास / पांडुरंगा
*शीला पाटील. चांदवड.*
*नाशिक*