You are currently viewing भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाला उदंड प्रतिसाद

भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाला उदंड प्रतिसाद

*भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाला उदंड प्रतिसाद*

पिंपरी

कवी विजय वडवेराव आयोजित आणि प्रायोजित भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाला सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद लाभला. रविवार, दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पिंपरी येथे या काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ राज्यातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला. सुमारे दहा तासांहून अधिक काळ रंगलेल्या या महोत्सवात तीन वर्षे वयाच्या पूजा पाटील या चिमुरडीपासून ते वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशीपर्यंतच्या कवींनी मुक्तच्छंद, ओवी, पाळणा, गीत, गझल, पोवाडा, सुंबरान, अभंग (अखंड) असे वैविध्यपूर्ण काव्यप्रकार खडीबोली तसेच गेय शैलीत अतिशय प्रभावीपणे सादर केले. सहभागी कवींना मानाची शाल, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे श्रीमती सुगलाबाई, सौभाग्यवती रीना आणि कुमारी स्वरा वडवेराव या एकाच घरातील तीन पिढ्यांमधील स्त्रीशक्तीचे प्रतिनिधित्व करणार्‍या महिलांच्या हस्ते पूजन करून महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून विजय वडवेराव यांनी, “२०१२ मध्ये पहिल्यांदाच भिडेवाड्यात गेलो आणि तेथील दुरवस्था पाहून ‘भिडेवाडा बोलला’ या दीर्घकवितेचे एकटाकी लेखन हातून घडले. त्यानंतर त्याच वास्तुत पंचवीस कवींना घेऊन एकमेव कविसंमेलन आयोजित केले. संपूर्ण देशाला स्त्रीमुक्ती आणि स्त्रीशिक्षणाची प्रेरणा देणार्‍या भिडेवाड्याच्या भग्नावस्थेविषयी समाजजागृतीसाठी कवितेच्या माध्यमातून वेळोवेळी विविध उपक्रम राबवून चळवळ उभी केली. त्यामुळे आजतागायत देशभरातून आणि विदेशात भिडेवाडा या विषयावर हजारो कवितांचे लेखन करण्यात आले आहे. यासाठी सहभागी कवींनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांच्या योगदानाचा अभ्यास केला. भावी काळात या चळवळीची व्याप्ती देशभरात किंबहुना विदेशातही विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे!” अशी माहिती दिली.

महोत्सवादरम्यान सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील वंशज दिलीप नेवसे तसेच पाचही राज्यातील कवींचे प्रतिनिधी आणि शेकडो कवी यांच्या साक्षीने विजय वडवेराव यांना ‘भिडेवाडाकार’ ही उपाधी बहाल करून, फुले पगडी आणि उपरणे प्रदान करीत गौरविण्यात आले. अनुक्रमे कविता काळे, डॉ. तेजस्विनी कदम, मीनाक्षी जगताप, प्रतिमा काळे, ॲड. उमाकांत अदमाने आणि सविता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय वडवेराव यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा