You are currently viewing सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे पावशी हायवेवर ‌गाडीत अडकलेल्या पर्यटकांना जीवनदान

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे पावशी हायवेवर ‌गाडीत अडकलेल्या पर्यटकांना जीवनदान

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे पावशी हायवेवर ‌गाडीत अडकलेल्या पर्यटकांना जीवनदान

पावशी ‌ग्रामस्थ, माजी सरपंच पप्या टवटेंसह महामार्ग पोलीसांचे तात्काळ मदत कार्य

कुडाळ

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावशी हायवेवर पाणी भरल्याने पर्यटकांची मुस्कान लक्झरी गाडी पाण्यात अडकली. त्यात प्रवासी अडकले होते.
निखिल गवळी 27 पंढरपूर, गिरीमालेश्वर पवार 24 सांगोला, प्रणाली महिंद्रकर 20, अर्चना महिंद्रकर 38, यशोदा महिंद्रकर 80
सोलापूर हे पर्यटक अडकले होते.

पोलीस उपनिरक्षक गोसावी, पोलीस हवालदार देसाई‌, पोलीस नाईक दळवी, पोलीस हवालदार डिसोझा हे महामार्ग पोलीस मदत कार्यात सहभागी झाले होते. तसेच पावशी माजी सरपंच पप्या तवटे, मनोज वालावलकर, देवेश गोसावी, राजू तवटे,सचिन सावंत, अमित तेंडोळकर, शुभम गोसावी आणि पावशी तील ग्रामस्थांनीही मदत कार्य करून प्रवाशांची सुटका केली..

प्रतिक्रिया व्यक्त करा