You are currently viewing नववर्ष

नववर्ष

नववर्ष

सरत्या वर्षाचा निरोप,
असतो एक समारंभ.
नव्या वर्षाचं स्वागत,
नव्या नवलाईचा आरंभ.

जाताना साल जुनं,
सुखापेक्षा दुःखच देऊन गेलं.
काही जवळचे काही दूरचे,
स्वतः सोबतच घेऊन गेलं.

आठवणींच्या कुपीत जपायचे,
असे न दिले कोणतेही क्षण.
आपल्या परक्यांची झाली ओळख,
अन दिले हृदयावर कायमचे व्रण.

माणसातला माणुसकीचा गहिवर,
खेडोपाडी, रस्तोरस्ती दिसला.
कुठे डॉक्टर देवासमान वाटला,
अन सख्खा भाऊही वैरी भासला.

वर्ष सरलं,उरल्या आठवणी,
नात्यांमधील फट दिसे क्षणोक्षणी.
काही जपल्या काही खुपल्या,
वेडं मन सांडी अश्रू मनोमनी.

स्वागत होतंय नवंवर्षाचं,
अंधार अजुनी मिटला नाही.
फटाके फुटती पार्ट्या झडती,
दीप आशेचा अजुनी पेटला नाही.

दीप आशेचा…..
…..अजुनी पेटला नाही.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा