You are currently viewing महाकवी कालिदासाचे स्मरण म्हणजे मूल्य संस्कारांचे उर्जाभरण – डॉ. न. म. जोशी

महाकवी कालिदासाचे स्मरण म्हणजे मूल्य संस्कारांचे उर्जाभरण – डॉ. न. म. जोशी

*महाकवी कालिदास जयंती समारंभ संपन्न*

 

पुणे :

महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा २० वा वर्धापन दिन व महाकवी कालिदास जयंती *आषाढस्य प्रथम दिवसे* धारेश्वर विद्यालय सभागृहात दि. ०६ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग गुरू मा.श्री. डॉ.संप्रसाद विनोद कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार चे संचालक मा. प्रा. सुनील कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी आणि प्रा. सू. द. वैद्य उपस्थित होते.

कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी ग्रंथ दिंडी काढण्यात आली ज्यात धारेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलननाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध भावकवी श्री. वि. ग. सातपुते यांनी केले तर सर्वांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री. काकासो चव्हाण यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र ठाकूरदास यांनी महाकवी कालिदास वांगमया विषयी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवार डॉ. न.म. जोशी सर तसेच प्राचार्य सू.द. वैद्य सर यांनी संस्थेबद्दल आपले आपली मनोगते व्यक्त केली. संस्थेतर्फे मान्यवरांचा यथोचीत सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या प्रथेप्रमाणे या वर्षी देखील पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी वि. ग. सातपुते यांच्या संस्कार शिदोरी या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ज्येष्ठ कविवर्य चं. गो. भालेराव यांच्या प्रीतगुंजन या काव्यसंग्रहाचे, मा. त्र्यंबक बोरीकर लिखित प्रतिभांकुर या काव्यसंग्रहाचे व काव्यानंद प्रतिष्ठान पुणे (सुनिल खंडेलवाल) साईश इन्फोटेक यांच्या ई मासिक पत्रिकेच्या ५० व्या डिजिटल अंकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. विशेष म्हणजे कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे आजपर्यंत ऐकूण ६८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

दरवर्षी कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास प्रतिष्ठाच्या लक्षवेधी पुरस्काराने खालील मान्यवरांना सन्मानित कऱण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व इंग्रजीचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. शिरीष चिंधडे सर, महाराष्ट्र. मंडळाचे उपाध्यक्ष मा. गुराय्या रे स्वामी, (गुलबर्गा) आणि मानसतज्ञ सौ. नूतन शेटे या कार्यक्रमात मा. डॉ. राजेंद्र पडतुरे बेंगलोर यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात मान्यवर कवी / कवयित्री यांना महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तर्फे “राष्ट्रीय साहित्य साधना” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव (पुणे) डॉ. राजेंद्र पडतुरे (बेंगलोर), व्यंकटेश कुलकर्णी (हैद्राबाद) डॉ. संध्या राजन अणवेकर (बेंगलोर) गझलकार सुधीर कुबेर (पुणे), मंजुषा आचरेकर (पुणे), सुनिल खंडेलवाल (पुणे), यशवंत देव (पुणे), वंदना ताम्हाणे (मुंबई), मकरंद घाणेकर (पुणे), सुलभा सत्तुरवार (चिंचवड), दीपाराणी गोसावी (पुणे), नलिनी कापरे (पुणे) विनोद आश्ठुळ (हडपसर पुणे) या सर्वांनी आपल्या रचना सादर केल्या.

या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री ऍड संध्या गोळे या होत्या तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सौ ऋचा कर्वे आणी सौ. घाणेकर यांनी केले.

अशाप्रकारे हे महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे राष्टीय संमेलन उत्साहात पार पडले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महकवी कालिदास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा