You are currently viewing भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यात 10हजार झाडे लावण्याचा संकल्प

भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यात 10हजार झाडे लावण्याचा संकल्प

*डॉ शामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती चे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल ओरोस येथे वृक्षारोपण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ*

 

ओरोस :

भाजपा किसान मोर्चा, सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यात १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असुन, डाॅ.शामाप्रसाद मुखर्जींच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा जिल्हाध्यक्ष सन्मा.प्रभाकर सावंत यांच्या शुभ हस्ते आणि किसान मोर्चा प्रभारी व जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, किसान मोर्चा अध्यक्ष उमेश सावंत, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब, प्रदेश उपाध्यक्ष भाई बांदकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविका मध्ये उमेश सावंत यांनी किसान मोर्चा च्या माध्यमातून झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये सन २०२२ मध्ये सामूहिक शेती हा कार्यक्रम हडी तालुका मालवण या ठिकाणी करण्यात आला. सन २०२३ मध्ये भरड धाण्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी ५ एकर क्षेत्रावर मका ची लागवड कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावी किसान मोर्चा सरचिटणीस श्री.गुरुनाथ पाटील यांच्या शेतामध्ये केली होती. तसेच दिनांक ७.७.२०२४ रोजी हळद बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात तुळस गावी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी वृक्ष लागवड करुन फक्त चालणार नसून ती 100% जगविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

श्री रणजित देसाई यांनी रानभाज्या प्रदर्शन आणि भाज्यांची पाककला स्पर्धेचे आयोजण किसान मोर्चाने करावे असे सांगून वृक्षारोपण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी कसाल पंचक्रोशी संस्थेचे सचिव यशवंत परब, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ भाई बांदकर यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी,सन्मा. डॉ सुशील परब,लाड, मुख्याध्यापक अशोक रायबान, संजीव राणे , किसान मोर्चा पदाधिकारी ज्योती देसाई , सूर्यकांत नाईक , महेश सारंग, महादेव सावंत, उदय सावंत , गणेश सांगवेकर , वैभव शेणई , मिलिंद लोहार , हरी केळुसकर , संतोष जुवाटकर यांच्या सह पालक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश संसारे यांनी केले. तर आभार जिल्हा संघटक श्री विजय रेडकर यांनी मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रम सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा