You are currently viewing सिंधुदुर्ग कन्या डॉ.धनश्री लक्ष्मण पाटकर हिने रशियातील स्मोलेंक्स स्टेट मेडी. युनिव्हर्सिटी मधून प्राप्त केली एमबीबीएस पदवी

सिंधुदुर्ग कन्या डॉ.धनश्री लक्ष्मण पाटकर हिने रशियातील स्मोलेंक्स स्टेट मेडी. युनिव्हर्सिटी मधून प्राप्त केली एमबीबीएस पदवी

कुडाळ:

 

मुंबईस्थित डॉ.धनश्री लक्ष्मण पाटकर ही मूळची झाराप (गावडेवाडी) ता.कुडाळ येथील रहिवासी असून तिने रशिया, मॉस्को येथील स्मोलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मधून एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे.

डॉ.धनश्रीचे वडील लक्ष्मण कुशा पाटकर हे मूळ झारापचे सुपुत्र असून ते सुद्धा उच्चशिक्षित(B.COM., M.A. LL.B., LGS) असून त्यांना साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, काव्यांजली पुरस्कार, सर्वद फाउंडेशनचा सर्वोत्कृष्ट साहित्यिक आदी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरीक्षक या पदावर ते कार्यरत आहेत. मुलीने विदेशात शिकत असताना मिळविलेल्या यशाने पाटकर कुटुंबीय भारावून गेले आहेत. डॉ.धनश्री हिच्या दैदिप्यमान यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसह झाराप ग्रामस्थांनी तिचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा