You are currently viewing कणकवलीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

कणकवलीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

कणकवलीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

कणकवली :

कणकवली शहरातील प्रल्हाद महानंद साटविलकर (वय ४४ वर्षे रा. समर्थनगर, साईपुजा अपार्टमेंट) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रल्हाद हे एका खाजगी संस्थेत अकाउंटंट पदावर कार्यरत होते. काल शुक्रवार दि ५ जुलै रोजी प्रल्हाद जेवल्यानंतर आपल्या खोलीत झोपायला गेला.

६ जुलै रोजी सकाळी नेहमीच्या वेळेत प्रल्हाद खोलीबाहेर न आल्यामुळे त्याच्या आईने दरवाजा उघडला असता प्रल्हाद चा मृतदेह छताच्या फॅन ला लटकलेल्या अवस्थेत होता. याबाबतची खबर मयत प्रल्हाद ची आई सुनीता हिने कणकवली पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास हवालदार विनोद सुपल करत आहेत.

WhatsApp

प्रतिक्रिया व्यक्त करा