*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गझल रचना*
*वृत्त विमला*
लगावली : ललगा लगागा
लढतात काही
हरतात काही
पडले तरीही
उठतात काही
हळव्या मनाचे
खचतात काही
बळ देत साऱ्या
भिडतात काही
कटतात झाडें
रडतात काही
चिमण्या सवेची
हसतात काही
वरचीच शोभा
भुलतात काही
नुकसान होता
शिकतात काही
वळवून मुठी
लढतात काही
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे