You are currently viewing मोक्षमुक्ती

मोक्षमुक्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मोक्षमुक्ती*

 

किती हवासा एकांत मन झाले कसे शांत

नाही गोंधळ गोंगाट सारे आतून निवांत…..।। धृ।।

 

नको सल नको भास नको शब्द नको नाद

नको इर्षा नको खेद नको‌ कुणाशीही वाद

येई‌ सावळ्याची साद किती हवासा एकांत

नाही गोंधळ गोंगाट सारे आतून निवांत…….।।१।।

 

साद येता हळू कानी मिटे मनाची ती भ्रांत

झाले अंतरी निवांत होई मीपण हो श्रांत

तुझ्या चरणाशी व्हावे सदा तन मन‌ शांत

नाही गोंधळ गोंगाट सारे आतून निवांत…..।।२।।

 

नच उरली आसक्ती तनमन गुंते विरक्ती

श्वास तुज आळविती झणी दे रे मोक्षमुक्ती

व्हावा शांतपणे आता जीवनाचा रे सुखांत

नाही गोंधळ गोंगाट सारे आतून निवांत…..।।३।।

 

©️®️ डॉ मानसी पाटील

मुंबई‌

प्रतिक्रिया व्यक्त करा