सौ वैष्णवी मोंडकर भाजपा, उपाध्यक्ष महिला मालवण शहर
31 ऑगस्ट पर्यंत हॉटेल श्री महाराज येथे सुरु राहणार माहिती कक्ष
मालवण :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजचेचा लाभ समाजातील 21 ते 65 वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, अविवाहित विधवा महिलाना होण्यासाठी विकास मालवण संस्था, मातृत्ववरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून हॉटेल श्री महाराज मालवण पेट्रोलपम्प नजीक मालवण येथे दिनांक 5/7/24 रोजी शिबीराचचे सकाळी 10.30 ते सा.4 वाजता या वेळेत आयोजन केले होते त्याला महिला वर्गाकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 242 महिलांना सदर योजनेची माहिती देण्यात आली आणि ज्या महिलांचे कागद पूर्ण होते अश्या 121 महिलांचे अर्ज परिपूर्ण रित्या भरून घेण्यात आले असून अजूनही योजना कालावधी 31 ऑगस्ट असल्याने तसेच अनेक महिलांचे कागद पत्र अपूर्ण असल्याने महिलानां सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी 31 ऑगस्ट 24 पर्यंत सकाळी 11 ते 4 या वेळेत योजना अर्ज माहिती कक्ष चालू राहणार असून योजनेची माहिती तसेच महिलांचे अर्ज विनामूल्य भरून घेतले जाणार असल्याची माहिती सौ वैष्णवी मोंडकर यांनी दिली आहे यावेळी श्री भालचंद्र राऊत सिंधुदुर्ग जिल्हा एनजीओ जिल्हाध्यक्ष भाजपा ,श्री विष्णू मोंडकर भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री धोंडी चिंदरकर भाजपा तालुका अध्यक्ष मालवण श्री महेश मांजरेकर सरचिटणीस भाजपा मालवण तालुका तसेच संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर योजनेच्या पात्र महिलांनी रेशन कार्ड,घरपत्रक उतारा ,सातबारा ,मतदान कार्ड ,आधार कार्ड,पासपोट साईज फोटो शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र विवाहित असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट ,बँक पासबुक हे कागद घेऊन वरील वेळेत उपस्थित रहावे अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख 50 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.सदर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे,राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भय करणे,महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याचा असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सदर सादर करायचे आहेत.लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे असून वय 21 ते 65 वर्षे असणे गरजेचे आहे अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थीचे बँक खाते आवश्यक आहे सदरं योजना विवाहित.घटस्फोटित,विधवा,परितक्त्या,अविवाहित
निराधार महिलासाठी शासन राबविणार आहे ज्यांचा वय अधिवास दाखल्या ऐवजी 15 वर्षा पूर्वीचे जन्म प्रमाण पत्र,शाळा सोडल्याचा दाखला ,मतदान कार्ड ,रेशन कार्ड, या पैकी एक पुरावा गृहीत धरला जाणार आहे तसेच ज्या पात्र महिलेकडे 2.50 उत्पन्नाचा पुरावा नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना या दाखल्यासाठी सूट देण्यात आली आहे तसेच वरील निकषात बसणाऱ्या महिला बरोबरच कुटूंबातील एका अविवाहित महिलेला देखील वरील निकषात बसल्यास लाभ मिळणार आहे .शहरातील जास्तीत जास्त महिलांनी तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या संपर्कातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सौ वैष्णवी मोंडकर उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी मालवण शहर तसेच अध्यक्ष विकास मालवण संस्था,मातुत्ववरदान फाऊंडेशन यांनी केले आहे.