You are currently viewing हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर प्रा शाळेसाठी आमदार वैभव नाईक यांनी नियोजन मधुन 20 लाख निधी देऊन विद्यार्थी जिव धोक्यात का?,, सरपंच श्री अमृत देसाई, श्री अतुल बंगे!

हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर प्रा शाळेसाठी आमदार वैभव नाईक यांनी नियोजन मधुन 20 लाख निधी देऊन विद्यार्थी जिव धोक्यात का?,, सरपंच श्री अमृत देसाई, श्री अतुल बंगे!

हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर प्रा शाळेसाठी आमदार वैभव नाईक यांनी नियोजन मधुन 20 लाख निधी देऊन विद्यार्थी जिव धोक्यात का?,, सरपंच श्री अमृत देसाई, श्री अतुल बंगे!

कुडाळ

हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा पुर्ण धोकादायक असल्याने पालक आंदोलन पवित्र्यात असताना पालकांना आमदार वैभव नाईक यांनी २०लाख रुपये मंजुर करुनही विद्यार्थी धोकादायक स्थितीत का?असा संतप्त सवाल सरपंच श्री अमृत देसाई आणि शिवसेनेचे अतुल बंगे यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन विचारला आहे !
हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर ही प्रा शाळा असुन किमान ३०विद्यार्थि शिकत असताना ही ईमारत मोडकळीस आल्याने पालकांनी उठाव घेऊन आमदार वैभव नाईक यांना हुमरमळा येथे कार्यक्रमात पालकांनी भेट घेतली असता आम नाईक यांनी दीलेल्या आश्वासनाप्रमाणे २० लाख रुपयांचा निधी नियोजन मधुन मंजुर करुन घेतला परंतु आचारसंहिता कारण पुढे करुन या कामाला चालढकल पणा केली जात असताना विद्यार्थी स्थलांतरीत करण्यात आले आहेत असे सांगुन श्री देसाई, श्री बंगे यांनी सांगितले निधी मंजूर असुन शिक्षण विभाग चालढकल पणा का करीत असुन विद्यार्थ्यांना धोकादायक स्थितीत का ठेवले जाते असा सवाल करुन येत्या दहा दिवसांत शाळा बांधकाम करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने हालचाली केल्या नसतील तर १५ आॅगष्ट २०२४ ला पालक व विद्यार्थी यांच्या समवेत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी यांना घेऊन बसवण्यात येतील असा इशारा श्री बंगे व देसाई यांनी दीला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा