You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या लक्षवेधीवर तातडीने कार्यवाही सुरू

आमदार नितेश राणे यांच्या लक्षवेधीवर तातडीने कार्यवाही सुरू

आमदार नितेश राणे यांच्या लक्षवेधीवर तातडीने कार्यवाही सुरू

*पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ८ जुलै रोजी जल जीवन मिशन ची घेणार आढावा बैठक

* जल जीवन चा प्रत्येक कामाचा आढावा घ्यावा, अशी आमदार राणे यांनी केली होती सभागृहात मागणी

(विधान भवन)
भाजप आमदार नितेश राणे यांच्या विधान सभेतील मागणीची दखल घेत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील जल जीवन मिशन योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवार दि. ०८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. मंत्री महोदयांच्या दालनात क्र. ४०२, चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे ही बैठक होणार आहे.
विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधी च्या माध्यमातून राज्यातील जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मंत्री महोदयांनी जिल्हा निहाय बैठका घेऊन आढावा घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिवेशनाच्या काळातच प्रत्येक जिल्ह्यातील बैठक आपण घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक योजनेचे काम कोणत्या पद्धतीने चालू आहे याचा आढावा त्या त्या जिल्ह्यातील आमदारांसमवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवार ८ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हयातील जल जीवन मिशन योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा