You are currently viewing लिंगेश्वर मित्रमंडळ जे जे उपक्रम राबविल त्याला आमचे संपूर्ण सहकार्य लाभेल- आ. वैभव नाईक

लिंगेश्वर मित्रमंडळ जे जे उपक्रम राबविल त्याला आमचे संपूर्ण सहकार्य लाभेल- आ. वैभव नाईक

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित लिंगेश्वर प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाने गेली १६ वर्ष विविध उपक्रम सातत्याने सुरु ठेवले आहेत. हि कौतुकास्पद गोष्ट आहे. मंडळाच्या माध्यमातून एखादा उपक्रम सातत्यपूर्ण राबविणे हे सोपे नसते.परंतु हळवल सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील युवकांनी हे सातत्य राखले आहे. त्यामुळे या सर्वांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी आमची आहे.माझी राजकीय सुरुवात हळवल परबवाडीतूनच झाली आहे. यापुढच्या कालावधीत लिंगेश्वर मित्रमंडळ जे जे उपक्रम राबविल त्याला आमचे संपूर्ण सहकार्य लाभेल. असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हळवल येथील क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी केले.

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने लिंगेश्वर प्रीमिअर लीग (LPL) क्रिकेट स्पर्धा शनिवार २ जानेवारी व रविवार ३ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सतीश सावंत व संदेश पारकर यांनी क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देत गावातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार, तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करणार, त्याचबरोबर मंडळाच्या कायम पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, रामू विखाळे, भास्कर राणे, हळवल सरपंच दीपक गुरव, उपसरपंच अरुण राऊळ, मंडळाचे अध्यक्ष लवू परब, रवी परब, उमेश परब, श्री चौकेकर, मंगेश गावडे, वामन परब, दीपक राऊळ,भरत गावडे, विकास गावडे, विठोबा ठाकूर, प्रभाकर चव्हाण,शिवा राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा