You are currently viewing क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ चे स्कॉलरशिप परीक्षा मध्ये घवघवीत यश

क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ चे स्कॉलरशिप परीक्षा मध्ये घवघवीत यश

*प्रशालेच्या दोन विद्यार्थांना मिळाली शिष्यवृत्ती*

 

कुडाळ :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेचे विद्यार्थी शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्ती मध्ये कु. पार्थ विश्वास धुरी 21 वा क्रमांक व कु. ऋग्वेद राघो नाईक यांनी 30 वा. क्रमांक पटकावला आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेचे एकूण 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच गुणवत्ता यादीत आलेल्या दोन विद्यार्थ्याचे आज प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मुमताज शेख मॅडम यांनी पुषपगुच्छ व भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. प्रशालेचे शिक्षक पूर्वा राऊळ , भगवान केळुसकर, भावना धुरी, स्नेहा परुळेकर, पूजा खानोलकर, तन्वी सावंत यांचे विद्यार्थांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.

शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख मॅडम यांचे संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा