You are currently viewing सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली संघ विभाग स्तरासाठी पात्र.

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली संघ विभाग स्तरासाठी पात्र.

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली संघ विभाग स्तरासाठी पात्र.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या पंधरा व सतरा वर्षाखालील दोन्ही संघांनी जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून विभागस्तरासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला दबदबा कायम राखला आहे.
वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे दिनांक. ०२/०७/२०२४ व दिनांक ०३/०७/२०२४ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल संघाने प्रथम फेरीत व्ही एन नाबर संघाविरुद्ध ४-० गोलनी विजय मिळविला.कॅडेट जय थोरे २ गोल, कॅडेट समाधान गोरे २ गोल करून संघाला विजय मिळवून दिला. द्वितीय फेरीत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे संघाविरुद्ध ५-० गोल नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. यांत कॅडेट समाधान गोरे,जय थोरे,हर्षल गावडे,आयुष वानखेडे,रुद्र आपटे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
उपांत्य सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध २-० गोलनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.या सामन्यात कॅडेट आर्यन वारेकर व कॅडेट आर्यन शेडगे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.अंतिम सामन्यात मिलाग्रीस स्कूल विरुद्ध १-० गोल करून विजेतेपद पटकावले. कॅडेट आर्यन वारेकरने गोल नोंदवत या अटीतटीच्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.
दिनांक ०३/०७/२०२४ रोजी झालेल्या स्पर्धेत सतरा वर्षाखालील फुटबॉल संघाने प्रथम सामन्यात व्ही एन नाबर संघाविरुद्ध १-० गोलनी विजय मिळविला.कॅडेट साईश मेंगाने याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.उपांत्य फेरीत आजगांव संघाविरुद्ध ३-० गोल नोंदवत चमकदार कामगिरी केली.कॅडेट जय गावडे २ गोल, कॅडेट महादेव दे॓ऊलकर १ गोल करत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.गतवर्षी विजेत्या डाॅन बाॅस्को संघाविरुद्ध २-० गोल नोंदवत विजेतेपद पटकावले.कॅडेट ॲराॅन फर्नांडिस व कॅडेट वेदांत वातकर यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर पंधरा व सतरा वर्षाखालील वयोगटातील फुटबॉल विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला क्रिडा क्षेत्रातील दर्जा व गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली.विभागस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने प्राप्त केला.
फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ व क्रिडाशिक्षक सतिश आईर व मनोज देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, संचालक जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ, सर्व संचालक, प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी करून पुढील विभाग स्तराकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा