*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम अभंग रचना*
*प्रस्थान सोहळा*
ज्ञानोबा तुकोबा / स्मरण करत /
आळंदी देहूत / वारकरी … … … .. १
टाळ वीणा हाती / इंद्रायणी तीरी /
निघाले पंढरी / दर्शनाला… … … …२
गजर नामाचा / ताल अभंगांचा /
ठेका मृदंगाचा / चैतन्याचा… … … . ३
मुखात अभंग / वैष्णवांचा मेळा /
प्रस्थान सोहळा / भावपूर्ण… … … ..४
अंगावर घेत / सरी पावसाच्या /
दिंड्या भाविकांच्या / भक्तीमय… … .५
देवाचिये दारी / रूप विटेवरी /
उभा क्षणभरी / आत्मानंद… … … . ६
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏