You are currently viewing रिमझिम पाऊस धारा

रिमझिम पाऊस धारा

🌳🌦️🦚🌳🌦️🌈🦜🌴🐄🌳

 

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रिमझिम पाऊस धारा*

******************

 

रिमझिम रिमझिम पाऊस धारा

वनी नाचत फुलवी मोर पिसारा।।धृ।।

 

पसरले चैतन्य साऱ्या रानीवनी

भरला आनंद जीवाजीवांच्या मनी

वाजवी मंजूळ पावा रानचा वारा

वनी नाचत फुलवी मोर पिसारा।।धृ।।१।।

 

चहुबाजूंनी पसरली हिरवळ

रानचे ओहळ वाहती खळखळ

कडेकपारीतून वाजतो नगारा

वनी नाचत फुलवी मोर पिसारा।।धृ।।२।।

 

सप्तरंगात इंद्रधनुची कमान

नभी पाहताच वेधून घेई भान

केकावून साद घाली मोर लांडोरां

वनी नाचत फुलवी मोर पिसारा।।धृ।।३।।

 

मोकळ्या रानी हिरवा चारा खाऊनी

गाई-वासरे जाती खेळात रंगूनी

रिमझिम पाऊस सुखावे पाखरां

वनी नाचत फुलवी मोर पिसारा।।धृ।।४।।

 

******************************

*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गांव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा

प्रतिक्रिया व्यक्त करा