You are currently viewing वाभवे – वैभववाडी न.पं. येथे लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष

वाभवे – वैभववाडी न.पं. येथे लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष

वाभवे – वैभववाडी न.पं. येथे लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष

महीलांनी लाभ घ्यावा, नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी केले आवाहन

वैभववाडी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना कागदपत्रांची परिपूर्ण माहिती मिळावी तसेच कागदपत्रे जमा करण्यासाठी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने मदत कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा नेहा माईणडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

 

शहरातील महिलांना या योजनेची परिपूर्ण माहिती मिळावी. त्यांना लाभ मिळावा, योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठीच नगरपंचायतने हा पुढाकार घेतला आहे. हा स्वतंत्र मदत कक्ष सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार असून या ठिकाणी लाभार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले संबंधित प्राधिकरणाकडून घेऊन देण्यात येणार आहेत. शहरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध असल्याचे माईणकर यांनी पत्रात म्हटले आहे.
उपनगराध्यक्ष संजय सावंत, शहर प्रवक्ते, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र पाताडे यांनी महीलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकातून केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा