You are currently viewing कॅमेर्‍यासोबतच माझं जगणं…!

कॅमेर्‍यासोबतच माझं जगणं…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतच माझं जगणं…!*

सतरावे…!!

 

जमेलं तितकं मी

माझ्या जगण्याला सांभाळलं

कॅमेराला माझी दया आली

जन्मभराकरता त्याने मला कवटाळलं

 

आयुष्याच्या सुखद आठवणी

नव्याने तो माझ्यात जागवतो

मनातला निराशेचा कोलाहल थांबवत

निसर्गाशी एकरूप होऊन जातो

 

माणसं!हल्ली हृदयापासून भेटतचं नाही

ओळखीच्या नजरेने कॅमेरा त्यांना भेटतो

लेन्सवर खानदानी खोटी सोंग घेऊन

गात नाचत तोच माझी वरात काढतो

 

मी नाही!कॅमेराच प्रेमाने खुणावतो

आज्ञा त्याची!त्याच्यामागून चालायचं असतं..

प्रेमाची पाखरं घालून हसायला सांगेल

शरण जायला सांगून स्थिर व्हायला सांगत…

 

निसर्गदत्त देणगीतून उधारीचं जगणं माझं..

कॅमेराच मला या अभिशापातून मुक्त करतो..

माझ्यात अहंकार अंकुरित होण्यापूर्वीच

हक्काची माझी भूमी फोटोतून धोपटतो

 

माझं जग बाबा!आभासी आहे रे..

खरंतर डोळ्यांत माझ्या तू मावत नाहीस

तुझ्या जगण्याला एक सुंदर दिवस देतो

हिरोच्या रूपात तुला बघायचं एवढाचं आजवरचा माझा सहवास…

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा