You are currently viewing या ‘ पण ‘ चे काय करु?

या ‘ पण ‘ चे काय करु?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*या ‘ पण ‘ चे काय करु?*

 

आहे अवर्णनीय पण

पण होई मध्येच खंण |

शंकासंशयाच्या घणाचे

आघात मनावर घंण ||१||

कधी कधी पण घातक

पण कधी चिंता सूचक |

पण सावधानतेसाठी

इशारा दर्शक अचूक ||२||

देणार्‍यांचा पण असतो

मनासारखेच होण्याचा |

असा एक असतो क्षण

शक्ती पणाला लावण्याचा ||३||

पण कधी पण पण हो

जिव्हा शब्दोच्चारी भीतसे |

न्यायी हा जाणून गरज

धीर हतबला देतसे ||४||

समस्त दुष्कर्मा आधीच

करण्या सावध तो पण

सकल सुकर्मामागून

करी सावध तोही पण ||५||

अशा पणाला सावध हो

सावध होऊन नम्र हो |

पडून पणाच्या जाळ्यात

हरु नको ज्ञानी नम्र हो ||६||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. – वेंगुर्ला,

जि. – सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा