You are currently viewing “बाबांची जन्मशताब्दी” निमित्ताने कार्यक्रमात पोस्टल कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती

“बाबांची जन्मशताब्दी” निमित्ताने कार्यक्रमात पोस्टल कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती

*साहित्यिक विनय सौदागर कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम*

 

साहित्यिक विनय सौदागर कुटुंबियांकडून प्रत्येक महिन्याला बाबांची जन्मशताब्दी निमित्त विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. जून महिन्यात बाबांची जन्मशताब्दी (कै. वामन नारायण सौदागर ३०/८/२३ ते ३०/८/२४) निमित्त मुलांना पोस्टल कामकाजाविषयी माहिती देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

आजगाव पंचक्रोशीतील मुलांना पोस्टल कामकाज समजण्यासाठी एक अनेखा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना जवळच्या शिरोडा पोस्ट ऑफिसमध्ये नेण्यात आले. विनंतीला मान देऊन तेथील कर्मचाऱ्यांनी पोस्ट खात्यातील विविध सेवा समजावून सांगितल्या. टपालपेटीतून सुरू होणारा पत्र-पार्सलचा प्रवास, पोस्टल बॅग, ब्रिटिशकालीन परंपरा लाभलेले पोस्टातील शिक्के, पोस्टाचे आर्थिक व्यवहार तसेच पोस्टातील आर्थिक गुंतवणूक योजना आदी सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. हा उपक्रम आपले वडील कै. वामन नारायण सौदागर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त सौदागर कुटुंबियांकडून राबविण्यात आला. या कामी आजगावच्या गोगटे गुरुजी प्रतिष्ठानची मदत झाली.

यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक मुलाला दोन पोस्टकार्ड , एक आंतरदेशीय पत्र आणि पाच स्टॅम्प भेट दिले. मुले आता पत्र लिहून पाठवणार आहेत.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विनय सौदागर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा