You are currently viewing शास्त्रीय गायन-वादन परीक्षांमध्ये सद्गुरू संगीत विद्यालयाचे यश….

शास्त्रीय गायन-वादन परीक्षांमध्ये सद्गुरू संगीत विद्यालयाचे यश….

शास्त्रीय गायन-वादन परीक्षांमध्ये सद्गुरू संगीत विद्यालयाचे यश….

७१ वर्षांची यशाची परंपरा कायम, १०० टक्के निकाल

सावंतवाडी:

विठ्ठल मंदिर सावंतवाडी, येथील श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या एप्रिल-मे २०२४ या सत्रामधील शास्त्रीय गायन-वादनाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल १००% लागला असून गेल्या ७१ वर्षांची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सद्गुरू संगीत विद्यालयामधून गायन – हार्मोनियम – तबला प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम – पूर्ण, मध्यमा प्रथम – पूर्ण तसेच विशारद प्रथम – पूर्ण अशा विविध परीक्षांसाठी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यामध्ये प्रारंभिक गायन या परीक्षेमध्ये काव्या कारेकर, आरोही परब, आरुषी परब, वैष्णवी नाटलेकर, तन्वी रंकाळे, सानिका जाधव, विभव विचारे. प्रारंभिक हार्मोनियम या परीक्षेमध्ये अनुज वझे, कर्तव्य बांदेकर, आलिशा मेस्त्री, चिन्मयी मेस्त्री, आराध्य प्रभू साळगावकर, आर्या गावडे, अर्जुन सावंत, पूर्वा म्हाडेश्वर, बापू राऊळ, देवेन राऊत, यश हरमलकर, राजस मुळीक, आर्यन बरागडे, श्रीधर देसाई, ओमकार तळकटकर, युवराज कानसे,उज्वल पाटील, गौरांग राऊत, प्रांजली खावरे, कृणाल नार्वेकर, भृंजल गावडे. प्रारंभिक तबला या परीक्षेमध्ये साहिल नाईक, विहान प्रभावलकर, समर्थ काळे, ज्ञानेश नाईक, हर्षवर्धन पाटणकर. प्रवेशिका प्रथम गायन या परीक्षेमध्ये सौ आशा मुळीक, सौ अंकिता वाडकर, श्रद्धा नार्वेकर, सौ गौरी जोशी, सायली सासोलकर, साक्षी बेरेकर, वैष्णवी कनयाळकर, श्रेया-महालटकर, मुग्धा पंतवालावलकर, दिव्यल गावडे, श्री दत्तगुरु जोशी, सुशांत सावंत, ऋतुज गोडकर, आरुषी जाधव. प्रवेशिका प्रथम हार्मोनियम या परीक्षेमध्ये पूर्वी धुरी,मृणाल मेस्त्री, सोमदत्त जाधव, कैवल्य बर्वे, आर्या राहुल, लक्ष्य सनाम, विराज राऊत, दिव्या गावडे, दीप्ती गवसकर, सौ दर्शना राणे, आरोही राणे. प्रवेशिका प्रथम तबला या परीक्षेमध्ये संचित धोंड, अथर्व भोसले, पार्थ गावडे, पवन पाटणकर. प्रवेशिका पूर्ण गायन या परीक्षेमध्ये अनुष्का पालव, ऋतुजा परब, सौ प्राची दळवी, तनवी दळवी. प्रवेशिका पूर्ण हार्मोनियमध्ये अक्षय रामाणे. प्रवेशिका पूर्ण तबला या परीक्षेमध्ये साईश पाटील, आदित्य नाईक, पुरुषोत्तम वेरेकर, उत्कर्ष सावंत, मंगेश सुतार, विशाल पेडणेकर, सोहम मेस्त्री, वैभव पेडणेकर. मध्यमा प्रथम गायन या परीक्षेमध्ये सौ अनामिका मेस्त्री, नम्रता नेवगी, अथर्व नाईक. मध्यमा प्रथम हार्मोनियम या परीक्षेमध्ये सुबोध नाईक, हर्षिता गावडे. मध्यमा पूर्ण गायन या परीक्षेमध्ये सौ मानसी वझे, नेहा दळवी, स्मिता गावडे. मध्यमा पूर्ण हार्मोनियम या परीक्षेमध्ये तन्वी मेस्त्री. विशारद पूर्ण गायन या परीक्षेमध्ये भास्कर मेस्त्री, ऍड.सिद्धी परब, निधी जोशी तर विशारद प्रथम हार्मोनियम या परीक्षेमध्ये मनीष पवार हे सर्व विद्यार्थी उत्तम गुण मिळवत प्रथम,व्दितीय तसेच विशेष योग्यता या श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी चे संचालक गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अर्चना फाऊंडेशन च्या सौ. अर्चना घारे – परब, श्री दिनकर परब, श्री किशोर सावंत, श्री वैभव केंकरे,श्री नितीन धामापूरकर, श्री सोमा सावंत, श्री तानाजी सावंत, श्री पुंडलिक दळवी, श्री हेमंत खानोलकर, सौ. पूजा दळवी, श्री वैजनाथ देवण, श्री संजय कात्रे, डॉ. श्रीराम दीक्षीत व विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान कमिटी यांच्या सह सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यानी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा