सिंधुदुर्गनगरी:
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यातील लोरे नं. 1 येथे गांगेश्वर ते सोनारवाडी रस्त्यावर सरपंच श्री अजय रावराणे केलेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई न झाल्यामुळे आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी साखळी उपोषण करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील लोरे नं. 1 येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम केलेल्या गांगेश्वर ते सोनारवाडी या रस्त्यावर सरपंच श्री अजय तुळशीदास रावराणे यांनी रस्त्यावर दुतर्फा पक्के चिरेबंदी रस्त्यावर पत्राचे पक्के छप्पर बांधून केलेल्या अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण केला आहे. याबाबत पालकमंत्री, जि. प. सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता कुडाळ, तसेच तहसीलदार, गट विकास अधिकारी कणकवली यांना या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची वारंवार मागणी तक्रार करूनही हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
सदर प्रकाराची कोणतीही कारवाई आत्तापर्यंत न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर 3 जुलै 2024 पासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. अमित रावराणे, निलेश राणे, चंदू रावराणे, विशाल राणे, प्रीतम राणे, रमेश राणे उपस्थित होते.