You are currently viewing दहा दिवसाच्या लेखी आश्वासनाअंती माजगाव सरपंच व उपसरपंच यांचे उपोषण मागे…

दहा दिवसाच्या लेखी आश्वासनाअंती माजगाव सरपंच व उपसरपंच यांचे उपोषण मागे…

दहा दिवसाच्या लेखी आश्वासनाअंती माजगाव सरपंच व उपसरपंच यांचे उपोषण मागे…

विशाल तनपुरे यांचे आश्वासन:संजू परब यांची यशस्वी शिष्टाई…

सावंतवाडी
तालुक्यातील माजगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर पूर्णवेळ कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी मिळावा यासाठी येथील पंचायत समिती समोर सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी उपोषण छेडले. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी येत्या दहा दिवसात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे लेखी पत्र संजू परब यांच्या यशस्वी शिष्टाई ने उपोषणकर्त्यांना दिले त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

माजगाव ग्रामपंचायत वर गेले की ते महिने कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे गावातील ग्रामस्थांना द्यावे लागणारे दाखले वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत होती शिवाय विकासकामांबाबत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत होते याआधी कायमस्वरूपी ग्रामीण विकास अधिकारी मिळावा यासाठी सरपंच अर्चना सावंत व उपसरपंच संतोष वेजरे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते यावेळी त्यांना लेखी आश्वासन देत ग्रामविकास अधिकारी येण्याचे मान्य करण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी ना मिळाले पुन्हा एकदा त्यांनी प्रशासनाला नोटीस देत उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. आज अखेर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच सौ सावंत व उपसरपंच वेजरे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले या उपोषणाला सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष प्रताप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला त्यांच्यासोबत शहर अध्यक्ष अजय गोंजावळे भाजपा किसान मोर्चाचे अजय सावंत मोहिनी मडगावकर सत्यवान बांदेकर, मेघांना साळगावकर,परीक्षित मांजरेकर,सचिन साटेलकर आदींनीही उपोषणाला पाठिंबा दर्शवला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनीही उपोषण स्थळी भेट घेत चर्चा केली अखेर दुपारनंतर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी लेखी आश्वासन देत ग्रामविकास अधिकारी संवर्गाची पदोन्नतीने पदभरती कामकाज येत्या दहा दिवसात होणार असल्याने माजगाव ग्रामपंचायत साठी प्राधान्याने रिक्त असलेले ग्राम विकास अधिकारी हे पद भरण्यात येईल असे सांगितले त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

WhatsApp

प्रतिक्रिया व्यक्त करा