You are currently viewing उत्पन्न दाखल्यासाठी चौकशी पत्राचा आग्रह नको…

उत्पन्न दाखल्यासाठी चौकशी पत्राचा आग्रह नको…

उत्पन्न दाखल्यासाठी चौकशी पत्राचा आग्रह नको…

सर्व तलाठ्यांना कुडाळ तहसीलदारांच्या सूचना..

कुडाळ

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजने साठी लागणाऱ्या
उत्पन्न दाखलाकरिता तहसील कार्यालयाकडील चौकशी पत्राचा आग्रह न धरता, उत्पन्न दाखले अर्जची तात्काळ चौकशी करून संबंधित लाभार्थी यांना अर्ज देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी तालुक्यातील सर तलाठ्यांना दिल्या आहेत.
यापूर्वी तहसील कार्यालयाकडील चौकशीचे पत्र उत्पन्न दाखल्याच्या अर्जसोबत जोडून मगच तलाठी यांचेकडील चौकशी करिता अर्ज पाठविण्यात येत होता.
परंतु महाराष्ट्र शासन यांनी 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आहे. त्यामुळे लाभार्थी यांचे तहसील कार्यालयामध्ये अर्ज करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.
चौकशी पत्रासाठी लाभार्थ्यांना वयोवृद्ध नागरिकांना तासनतास सेतूमध्ये उभे राहून विनाकारण त्रास होऊ नये. याकरिता माननिय तहसीलदार साहेब कुडाळ यांनी सर्व तलाठी यांना तहसील कार्यालयाकडील पत्राचा आग्रह धरू नये. तसेच संबंधित अर्जदार यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा