You are currently viewing वेंगुर्ल्यात ‘या जन्मावर प्रेम करावे’ कार्यक्रम उत्साहात..

वेंगुर्ल्यात ‘या जन्मावर प्रेम करावे’ कार्यक्रम उत्साहात..

वेंगुर्ला  :

 

“अणूरेणूतून या सृष्टीच्या सृजनाचे ऐश्वर्य उधाणे म्हणून उमटते अजुनही ओठांवर गाणे” असा सृष्टीच्या अणूरेणूतून सृजनाचा सोहळा पाहाणारे आनंदयात्री कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर ‘या जन्मावर प्रेम करावे’ हा काव्य वाचन व गायन असा कार्यक्रम येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने आयोजित केला होता. उभादांडा गावातील अविनाश चमणकर यांच्या रिसाॅर्टच्या लाॅनवर कार्यक्रम मोकळया वातावरणात आनंदयात्रींच्या आनंदाला उजाळा देत उत्साहात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अजित राऊळ होते. उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर होते. दीप प्रज्वलनाने व मंगेश पाडगावकरांच्या प्रतिमा पूजनाने उद्घाटन झाले. उद्घाटक मंगेश पाडगावकराना जवळून पाहिलेले व पाडगावकरांचा सहवास लाभलेले जयप्रकाश चमणकर आपल्या भाषणावेळी भावूक झाले. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक भाग्यवंत क्षण लाभले. आजचा कार्यक्रम हाही एक त्यातलाच. अशा शब्दात आपल्या गावात होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. उभादांडा गावचे सरपंच निलेश चमणकर यानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष अजित राऊळ, उद्घाटक जयप्रकाश चमणकर व सरपंच निलेश चमणकर यांचा आन॔दयात्रीच्या वतीने सुधाकर ठाकूर व पांडुरंग कौलापुरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

‘या जन्मावर प्रेम करावे’ या कार्यक्रमात पाडगावकरांच्या अपरिचित असलेल्या कवितांचे वाचन करण्यात आले. ‘कोलाहलात सार्या’ ही गझल अध्यक्ष अजित राऊळ यांनी सादर केली. ‘जीवंत असूनही जगता का आले नाही’ हे सांगणारी गझल दिव्या आजगावकर यांनी सादर केली. ‘अन्याय सहन करतानाही इथली माणसे चिडत का नाहीत’ हे विचारणारी गझल मेघस्वी भगत हिने, तर ‘मुखवट्यांच्या या जगात आवाज दिला तरी साद आली नाही’, ‘इथे मनातल खर गाण कोणीच गात नाहीत’ अस सांगणारी गझल आपल्या खास ढंगात स्वप्निल वेंगुर्लेकरने सादर केली. खर जीवन त्यानाच जगता येत ते कोणाकोणाला जगता येत हे सांगणारी गझल स्मिता नाबर यांनी, आजीचे वर्णन करताना जीवनाचे मर्म सांगणारी ‘संशय’ ही कविता प्राजक्ता करंगुटकर यांनी, बाजारातील गर्दीत कविला आलेला एक भावस्पर्शी अनुभव सांगणारी ‘मोकळ’ कविता डाॅ. पूजा कर्पे यांनी, काळा रग व उपेक्षित असलेल्या आत्म्याच्या मांडीवर लहानपणी बसलेले होते या आठवणीने कवीला आपण विठ्ठलाच्या मांडीवर बसलो होतो याचा साक्षात्कार होतो ही कथनात्मक कविता देवयानी आजगावकर यांनी प्रभावी रितीने सादर केली. स्वतःतून वेगळे होता येते तेव्हाच कवितेची निर्मिती होऊ शकते हे अधोरेखित करणारी ‘आकाश’ ही कविता माधवी मातोंडकर यांनी, विनोदी बालकविता साभिनय प्रितम ओगले यांनी सादर केली. सामाजिक विसंगतीवर भाष्य करणारी ‘अहो जग पुढे गेले ?’ ही कविता पांडुरंग सामंत यांनी, ‘आनंदयात्री’ ही कविता रश्मी भगत हिने तर ‘वेंगुर्ल्याचा पाऊस’ ही कविता आपल्या खास अभिनय शैलीत सादर करून योगीश कुलकर्णी यांनी रसिकांची दाद मिळवली. राजकारणावर भाष्य करणारी ‘पाॅलीटिक्स’ ही कविता संजय घाडी यांनी, ‘यात काही पाप नाही ‘ ही कविता जान्हवी कांबळी यांनी ,’मी कुठे म्हणालो परी मिळावी’ ही कविता सुनिधी मराठे हिने ‘नजर जराशी आवर ग’ ही कविता सुरेखा देशपांडे यांनी तर पाडगावकरांवर स्वरचित रचना पि. के. कुबल यांनी सादर केली. कवी सुधाकर ठाकूर यांनी पाडगावकरांच्या कवितांची वैशिष्ट्ये व पाडगावकरांचे सृजनशील कवींशी असलेले नाते तसैच पाडगावकरांनी आम्हाला कवीना काय दिले हे सांगणारे पाडगावकरांना लिहिलेले अनावृत्त पत्र वाचून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाला असलेली रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती. याच कार्यक्रमात सादर झालेली मंगेश पाडगावकरांची गीते अप्रतिम होती. एकापेक्षा एक गीतांनी कार्यक्रमात नाविन्य व रंगत आणली. कीर्तनकार ह भ प अवधूत नाईक यांनी ‘भेट तुझी माझी स्मरते’ हे भावगीत, ज्ञानेश करंगुटकर यांनी अभिषेकी गीत ‘माझे जीवन गाणे’ सादर केले. वासूदेव पेडणेकर यांनी ‘शब्दावाचुनी कळले सारे शब्दांपलिकडले’ हे गीत, सौ. श्रद्धा नाईक यांनी’ या जन्मावर शतदा प्रेम करावे हे गीत, डाॅ. संजीव लिंगवत यांनी ‘दिवस तुझे हे फुलायचे , आदिती मसूरकर यांनी भावगीत अशाप्रकारे भावगीतांनी रंगत आणली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाने एक संध्याकाळ यादगार केली.

सुरूवातीचे कार्यक्रमाचे निवेदन प्रितम ओगले यांनी केले. प्रस्ताविक व स्वागत वृंदा कांबळी यांनी व काव्यवाचनाचे निवेदन पांडुरंग कौलापुरे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना, कवितांची निवड व स्क्रिप्ट लेखन सौ. वृंदा कांबळी यांनी केले.

आनंदयात्रीचि सृजनविटि समजून घेताना या उपक्रमांतरागत दिवंगत साहित्यिकांचे साहित्य समजून घेताना त्यांचे विस्तव्य असलेल्या परिसरात जाऊन त्यांच्या साहित्यावर कार्यक्रम घेतले जातात. त्याप्रमाणे मंगेश पाडगावकरांच्या साहित्यावर उभादांडा परिसरात कार्यक्रम घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा