_*भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा तृतीय वर्ष निकाल ९४%*_
_*राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका निकाल जाहीर*_
_सावंतवाडी –
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण २०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत._
_कॉलेजच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून बाळकृष्ण सुशील परब ८८.५३ याने प्रथम, आदित्य दुर्गाप्रसाद जडये ८७.७४ याने द्वितीय व दिव्या दीपक परब ८३.१६ हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाचा निकालही १०० टक्के लागला असून पूजा बाबू लांबर ८९.०६ हिने प्रथम, शार्दुल दत्तप्रसाद जोग ८५.५६ याने द्वितीय व वेदांगी संदीप नलावडे ८४.६१ हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे._
_कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ९६ टक्के लागला असून स्टेफीरोज पीटर मोंटेरो ८९.८९ हिने प्रथम, सोनल सुनील गावडे ८८ हिने द्वितीय व सुयश सतीश केरकर याने ८७.३७ तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ८३ टक्के लागला असून सुयोग चारुदत्त जोशी ८८.४१ याने प्रथम, अनिरुद्ध अजय नाईक ८६.८७ याने द्वितीय व शुभम सुरेश मोडक ८४.७७ याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे._
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, सिव्हील विभागप्रमुख प्रसाद सावंत, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख दीपक पाटील, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रशांत काटे व मेकॅनिकल विभागप्रमुख अभिषेक राणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._