*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दाटून मेघ आले…*
दाटून मेघ आले
कडकून वीज गेली…
करवून धस्स ह्रदयी
उडवून नीज गेली…
करतोय मेघराजा
रिमझिम अशी नभातुन…
वर्षेत चिंब अवनी
लाजून आज गेली…
झालाय मेघराजा
अवनीवरी दिवाणा…
वर्षा सखी धरेला
सांगून राज गेली…
खट्याळ वात मोठे
विक्राळ रूप दावे…
भयभीत जीव जनजन
विसरून काज गेली…
ग्रिष्मात ऊन जेथे
होते धरेस जाळत…
वर्षा तिथे जशी ती
करवून सांज गेली…
आषाढ मास आणिक
चाहूल श्रावणाची…
चर्येवरी जनांच्या
चढवून साज गेली…
शशांक दिनकरराव देशमुख
चांदुरबाजार , जि. अमरावती
(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४
मो. क्र. ९९२३५३६३२५