*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम अभंग रचना*
*देवा पांडुरंगा (अभंग)*
आले मी शरण l देवा पांडुरंगा
तुजवीण जन्मा l अर्थ नाही ॥१॥
तुझ्या दर्शनाने |मिळे मज सुख
विसरते दुःख |विठ्ठला मी ॥२॥
आठवती भक्त | तुझ्या रंग-रूपा
देवा पांडुरंगा| मायबापा ॥३॥
रींगण रींगण|पालखीच्या संगे
धावे वेगेवेगे |झेंडेकरी ॥४॥
घेऊनिया विणा |पताका घेऊनी
भजन किर्तनी | वारकरी॥५॥
तुळशीची रोपे |डोई घेऊनिया
धावतात स्त्रिया | रींगणात ॥६॥
विठ्ठल विठ्ठल |गजर नामाचा
हरी किर्तनाचा | मोदभरे ॥७॥
विद्या रानडे