आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा -: सचिन हुंदळेकर
*सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ प्रभाग तळेरे- कासार्डे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न*
तळेरे – प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवून मार्गक्रम करा, शिका, संघर्ष करा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी विराजमान होण्याचे असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी कासार्डे येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ प्रभाग तळेरे कासार्डे पंचक्रोशी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.सोमनाथ कदम, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज व नेते मंडळ प्रभाग तळेरे कासार्डेचे अध्यक्ष व कासार्डे गावचे पोलीस पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र देवरुखकर,माजी तालुकाध्यक्ष प्रकाश वाघेरकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष शंकर चव्हाण, तळेरे- कासार्डे प्रभागाचे सचिव -संतोष जाधव, जेष्ठ कार्यकर्ते दत्ताराम जाधव,पत्रकार दत्तात्रय मारकड व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महाराष्ट्राचे युगप्रवर्तक,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमचा प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग सचिव संतोष जाधव यांनी करताना तळेरे कासार्डे प्रभागाच्या कार्याचा आढावा घेऊन सातत्याने उपक्रम जिल्ह्या सर्वप्रथम विविध उपक्रम राबविणारा प्रभाग असल्याचे गौरवोद्गार करीत मान्यवरांचे स्वागत केले.
प्रभागाच्यावतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच तळेरे- कासार्डे पंचक्रोशीतील विविध स्पर्धा परीक्षा,तसेच दहावी बारावी क्रीडापट्टू गुणवंत, यशवंत याशिवाय विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य,छत्री व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
चौकट
*संपत्तीपेक्षा संतती श्रेष्ठ -:डॉ .सोमनाथ कदम
सोन्या-नाण्यापेक्षा आपली मुलं सोन्यासारखी घडवा, त्यांना सर्वोच्च शिक्षण द्या कारण, संपत्तीपेक्षा संतती श्रेष्ठ असणारा आताचा काळ आहे. जीवनाच्या परीक्षेत मार्कापेक्षा गुणांची बेरीज मोठी असायला हवी असे सांगून, गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
……………………………
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर यांनी “मला शिकायचं” या कविता शानदार सादरीकरण करुन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपले यश हे समाजाचे बलस्थान आहे.तुमची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती होत असते त्यामुळे सत्काराची प्रेरणा घेऊन व कठोर परिश्रम करून आपापल्या क्षेत्रातील उच्च शिखर गाठण्याचे त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशून आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासार्डे ज्यु. कॉलेजचे प्रा.देवेंद्र देवरुखकर यांनी केले
या समारंभाला विजय देवरुखकर,अनिल चव्हाण,विठोबा देवरुखकर,नाना देवरुखकर,हर्षद देवरुखकर अन्य बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
शेवटी शंकर चव्हाण यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.सत्कार सोहळ्याला तळेरे – कासार्डे पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
______________________________
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*