You are currently viewing शाळांची शनिवारची वेळ न बदलण्याची मागणी..

शाळांची शनिवारची वेळ न बदलण्याची मागणी..

शाळांची शनिवारची वेळ न बदलण्याची मागणी..*

ओरोस

राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. हा आदेश आठवडाभर सकाळ सत्रात भरविल्या जाणाऱ्या शाळांसाठी असून जि. प. प्राथमिक शाळा या आठवड्यातील पाच दिवस सकाळी साडेदहा ते साडेचार या वेळेत भरविल्या जातात. फक्त शनिवारी एकच दिवस सकाळी ७.३० ते ११ अशी वेळ असल्याने या वेळेत बदल न करता ती वेळ तशीच ठेवावी, अशी मागणी जिल्हा प्राथ. शिक्षक समितीने केलीय. जिल्हयातील प्राथ. शाळा शनिवारी सकाळी लवकर भरत असल्याने शासन निर्णयाप्रमाणेच ‘आनंददायी शनिवार’, ‘दप्तराविना शाळा’ हे उपक्रम राबविणे सोयीचे आहे. शनिवारी शाळांमध्ये योगासने, व्यायाम, कवायत, ध्यानधारणा आदी उपक्रम राबविले जातात. आठवड्यातून एकच दिवस सकाळ- सत्र असल्याने शनिवारी शाळांची वेळ बदलू नये, अशी मागणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी जि. प. सीईओंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा