You are currently viewing रांगणागडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण

रांगणागडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण

कडावल वनपरिक्षेत्राचा उपक्रम

 

कुडाळ :

आज दि. १ जुलै २०२४ रोजी कडावल वनपरिक्षेत्र मध्ये नारूर रांगणागड पायथा परिसरात कडावल वनपरिक्षेत्र याअंतर्गत वन महोत्सव ची एक वेगळ्या प्रकारे सुरुवात करण्यात आली. रांगणागड पायथ्या परिसर येथे कडावल वन परिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल श्री अमित कटके, वनपाल श्री सुरेश मेतर, वनपाल गोठोस श्री महेश पाटील, वनपाल हिर्लोक श्री सदानंद कदम, श्री अनिल चव्हाण वनपाल कसाल, सौ रुपाली बुचडे वनपाल जांभवडे यांनी आपले सर्व वनरक्षक, वनमजूर व कार्यालयीन कर्मचारी करून यांनी सहकुटुंब एकत्र येऊन प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एक एक झाड लावले.

मान. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री नवकिशोर रेड्डी व श्री सुनील लाड सहाय्य वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वड, पिंपळ, जांभूळ, बहावा, करंज, अशी विविध प्रकारची झाडे लावली व महाराष्ट्र शासन तर्फे “Plant For Mother”, “एक पेड माँ के नाम” अशी घोषणा करत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून वनमहोत्सव साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा