*90% भारमान असलेली बोरवली स्लीपर बंद*
*निलेश तेंडुलकर यांनी विचारला आगार प्रमुखांना जाब*
*कुडाळ :
सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाने मोठा गाजावाजा करत बांदा बोरवली बांदा मुंबई सेंट्रल व बांदा लातूर या तीन शयनसेवा प्रवासासाठी सुरू केल्या होत्या. परंतु एक जुलैपासून भारमान मिळणार नाही असे गृहीत धरून बांदा बोरवली कुदाळ आगाराची फेरी बंद करण्यात आली आहे शेवटची फेरी 28 जून रोजी सोडण्यात आली होती त्या दिवशी सुद्धा तीस स्लीपर सीट पैकी 24 स्लीपर सीट वरून प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. बांदा बोरवली शयन यान सेवा सुरू झाल्यानंतर 75 वर्षांवरील वयोवृद्ध व महिला प्रवाशांनी गाडीचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला आहे बांदा बोरवली शयन यान सेवा बंद झाल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे याबाबत भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्ता सेलचे जिल्हा संयोजक व सेवा संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी आगार प्रमुख संदीप पाटील यांची भेट घेतली असता भारमान असताना आणि गाडी बंद गाडी वरिष्ठांच्या आदेशावरून बंद केल्याचे सांगितले. याबाबत निलेश तेंडुलकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे यांच्याशी संपर्क करून त्यांना वस्तुस्थिती सांगून येत्या काही दिवसातच बांदा बोरिवली गाडी पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.याबरोबरच सिंधुदुर्ग विभागाने बांदा मुंबई सेंट्रल व बांदा लातूर याही गाड्या बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.*
*कुडाळ स्थानकावरून पाचशे एसटी बसेस जाये करतात परंतु 30 जून पासून कुडाळ कंट्रोल कॅबिनमध्ये दोन कंट्रोलर ऐवजी एकाच कंट्रोलरची ड्युटी लावण्याचा घाट प्रशासनाकडून घेण्यात आला होता.पाचशे एसटी बसेसच्या जाण्या येण्याचे वेळा लिहून ठेवणे, चालकांच्या लॉग शीटवर एन्ट्री करणे,गाडी आल्याचे अनाउन्समेंट करणे तसेच कुडाळ आगाराच्या वाहकांच्या रकमा लिहून देणे व स्थानकावर घडणाऱ्या इतर घडामोडींवर लक्ष ठेवणे एवढे कामकाज एका माणसाने करायला कसे जमेल अशा आशयाचे निवेदन विभाग नियंत्रक यांना निलेश तेंडुलकर यांनी दिले होते त्याचबरोबर पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे या विषयात लक्ष वेधण्यात आले होते याची दखल घेत कुडाळ आगार प्रमुखांनी पूर्वी प्रमाणेच दोन कंट्रोलर पुन्हा बसवण्यास सुरुवात केली आहे असे निलेश तेंडुलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे*
*एक जुलैपासून चालक वाहनाकांसाठी अन्यायकारक ड्युटी अलोकेशनचे अंमलबजावणी कुडाळ आगार प्रमुख यांनी केल्याने कुडाळ आगाराचा कारभार कोलमडला होता याबाबतही संघटनेच्या वतीने निलेश तेंडुलकर यांनी आपली भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे.*
*यावेळी कुसगाव माजी सरपंच सुप्रिया घाडी, भाजपा कुसगाव बूथ प्रमुख सुनील तांबे,सुचित घाडी दिवाकर कुसगावकर सुरेश लाड गौरव कुसगावकर हे उपस्थित होते व त्यांनी कुसगाव मार्गावरील एसटी गाड्यांच्या समस्या आगार प्रमुखांकडे मांडत तीन निवेदने दिली*
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*