You are currently viewing भाताचे स्थानिक वाण संवर्धन गरजेचे – विजयकुमार राऊत

भाताचे स्थानिक वाण संवर्धन गरजेचे – विजयकुमार राऊत

कुडाळ :

 

दिनांक १७ जून ते १ जुलै या कालावधीत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आज एक जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून कृषी दिन साजरा करण्यात येतो. या पंधरवड्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी कुडाळ कार्यालयाच्या वतीने स्थानिक भात संवर्धन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेळा, वालय, पाटणी, पंकज, मोगरा, तसेच इतर भाताच्या स्थानिक वाणांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले जात आहे.

तालुका कृषी अधिकारी कुडाळ यांचे वतीने मुळदे तालुका कुडाळ येथील श्री स्वामी समर्थ शेतकरी गटास सिंधू रत्न योजनेअंतर्गत गट यांत्रिकीकरण योजनेचा लाभ देण्यात आला होता. या योजनेमध्ये गटास पावर टिलर ट्रॅक्टर, तसेच स्वयंचलित भात लावणी यंत्र यासारख्या अवजारांचा समावेश होता.

यावर्षी या गटातील शेतकरी श्री ज्ञानेश्वर गुणवंत माईनकर यांचे प्रक्षेत्रावर कृषी दिनाचे निमित्ताने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री विजयकुमार राऊत यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच यंत्राद्वारे स्थानिक भात बियाणे संवर्धन लागवडीचा शुभारंभ देखील श्री राऊत यांचे हस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी स्थानिक वाण संवर्धन ही बाब राबविणे बद्दल कृषी विभागास धन्यवाद दिले.

यावेळी स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प उपसंचालक श्री खुरकुटे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री परीट, कृषी अधिकारी श्री अमोल करंदीकर, मंडल कृषी अधिकारी श्री विजय घोंगे, श्रीमती गायत्री तेली, कृषी पर्यवेक्षक श्री दिनेश अनुसुरकर, श्री मंदार सरमळकर, कृषी सहाय्यक श्रीमती हरमलकर, श्री. रोशन मर्गज हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा