You are currently viewing बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली

बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली

*बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली*

*यशस्वी शिष्टाईने दुपदरीकरणाचा मार्ग मोकळा*

बांदा:-

येथे राष्ट्रीय महामार्गावर नियोजित उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असतानाच येथील एका साईड रोडचा प्रश्न हा गेले कित्येक महिने चर्चेचा विषय ठरला होता. या विषयावरून गावात वादंग निर्माण झाला होता.याची गांभीर्यता लक्षात घेत व स्थानिक बांदावासीयांची होणारी गैरसोय यांचा विचार करत बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक,सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर,सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे व यांनी आज संबंधित जागा मालक,कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी बैठक घेत यशस्वी शिष्टाई करत सदर रस्ता दुपदरी करण्याकरता येणाऱ्या अडचणी दूर करत प्रश्न मार्गी लावला. गेली अनेक महिने खितपत पडलेला प्रश्न सोडवल्याने बांद्यातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी बोलताना बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले की,हा प्रश्न सामोपचाराने सुटला ही आनंदाची गोष्ट आहे. यापुढे देखील आपला बांदा गावासमोरील महत्वाचे प्रश्न अशाच पद्धतीने सलोख्याने सोडवत इतरांसमोर एक चांगला आदर्श घालून देऊ.आज हा प्रश्न मार्गी लागला त्याबद्दल संबंधित जागा मालक व इतर नागरिकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक,गुरु कल्याणकर,प्रशांत बांदेकर,रत्नाकर आगलावे, हेमंत दाभोळकर,शामसुंदर धुरी,मोहन धुरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा