You are currently viewing श्री काशिराम उर्फ सागर विलास राठवड भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या संगीत भजन/गायन परीक्षेमध्ये सिंधुदुर्गातून प्रथम

श्री काशिराम उर्फ सागर विलास राठवड भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या संगीत भजन/गायन परीक्षेमध्ये सिंधुदुर्गातून प्रथम

श्री काशिराम उर्फ सागर विलास राठवड भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या संगीत भजन/गायन परीक्षेमध्ये सिंधुदुर्गातून प्रथम

कुडाळ

भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या संगीत भजन/गायन परीक्षेमध्ये श्री काशिराम उर्फ सागर विलास राठवड (कड़ावल) यांनी सिंधुदुर्गातून प्रथम विशारद होण्याचा बहुमान मिळवला आहे :- सत्र मे २०२४ मधून घेण्यात आलेल्या भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या सिंधुदुर्ग (SIN- 016) श्री जगन्नाथ संगीत विद्यालय केंद्रप्रमुख पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या केंद्रच्या वतीने घेण्यात येणार्या संगीत परिक्षामधून भजन/ गायन या विषयात सिंधुदुर्गातून प्रथमच विशारद होण्याचा बहुमान आणि तोही A+ श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा बहुमान श्री काशिराम उर्फ सागर विलास राठवड यांनी मिळविला आहे,ते बोलताना म्हणाले की आपल्या या यशामध्ये भजन शिक्षण गुरुवर्य सूर्यकांत भिलारे , कै.प्रमोद सुतार,श्री बाबल सुतार,तसेच शास्त्रीय शिक्षण गुरुवर्य श्री राजन माडये सर व संगीत अलंकार श्री अजित गोसावी सर यांचे बहुमोल आपल्याला मार्गदर्शन लाभले त्यामुळे हा संगीतातील महत्वाचा टप्पा आपण यशस्वी करू शकलो, वयाच्या दहाव्या वर्षी पासुन संगीत क्षेत्रात पदार्पण करुन अनेक संगीत स्पर्धा तसेच भजन/गायन यामधून वैयक्तीक पारितोषिके पटकावली आहेत तसेच अनेक स्पर्धांना परीक्षण म्हणून सुद्धा कार्य आपण केलेले आहे,अनेक दिग्गज कलाकारांना हार्मोनियम ची साथ उत्तम त्यांनी केलेली आहे,तसेच देवश्री संगीत विद्यालयाचे ते संचालक आहेत आणि जिल्ह्यामध्ये त्यांचे संगीत भजन,सुगम संगीत,शास्त्रीय संगीताचे वर्ग चालू आहेत तरी आपल्या या यशामध्ये आपले आईवडील यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन यामुळे तसेच गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाने व गुरुकृपेने आपल्याला हे यश मिळाले आहे असे ते यावेळी म्हणाले तसेच आपल्या सिंधुदुर्गातील भजनी बुवा तसेच गायक,तबला वादक,पखवाज वादक अशा सर्वांनी आपणही अशा प्रकारे संगीताचा अभ्यास करून परीक्षा द्याव्यात यासाठी पखवाज अलंकार श्री महेश सावंत (आंदुर्ले – कुडाळ)यांनी मोठे व्यासपीठ कालाकाराना उपलब्ध करून दिलेले आहे याचा अनेक कलाकारांनी लाभ घ्यावा व संगीत कलेत आपल्या सिंधुदुर्गला पुढे न्यावा अस त्यांनी यावेळी आवाहन केले आहे 🙏🚩🌹

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा